A day in life!

A memorable day in life! Never to be forgotten!!

Thursday, October 12, 2006

First day at hostel..

आला...आला..
फ़ायनली मी लहानपणापासुन वाट बघत असलेला दिवस आला..
मी सर्व लवाजम्यासकट होस्टेलवर येऊन दाखल झाले..
आता कोणाची कटकट नाही...
कोणी झोपेतुन ऊठवणार नाही...
अभ्यास कर म्हणुन मागे लागणार नाही...
वा..काय सुखी आयुष्य असेल माझं...

पण छे...कसला काय...
आल्या आल्याच पहिला बॉम्ब पडला.
रेक्टरबाई : "तुझी ईथे ऍडमिशन झालीच नाहीये,तुला ईथे रहाता येणार नाही.."
बाप रे...आता??
मी तर फ़ार शूरपणे एकटीच आले होते..
चांगलं आत्या म्हणत होती..की मी येते..तर तिला नको म्हणाले..
आता कुठे जाऊ? काय करू?
मला तर रडायलाच यायला लागलं..
तेवढ्यात आठवला की आपल्याकडे रिसीट आहे..
ती दाखवल्यावर म्हणते कशी..
"काहीतरि गोंधळ झालेला दिसतोयं..ही जागा तर मी आज सकाळीच आलेल्या मुलीला दिली..
थांब ..आपण तुझी दुसरी काहीतरी सोय करू या.. "
:( आणि त्यांनी मला एका छोट्याश्या ३ मुलीच्या खोलीत..जिथे आधीपासुनच ३ मुली होत्या,
तिथे जबरदस्ती घुसडला..
मी बिचारी...त्या तिघींच्या 'खाऊ का गिळू' च्या नजरा चुकवत सामान लावुन टाकले..

नंतर माझी 'गेलेली' जागा मला कळली..
काय सही होती..
रूम ला सेपेरेट entrance ..खिदकीजवळचा बेड..
आणि होस्टेल मधली सगळ्यात मोठ्ठी रूम..
तेव्हापासुन आजपर्यंत त्या रेक्टरबाईला शिव्या घालत्ये.. @##$%#@#%#

3 Comments:

At October 13, 2006 12:38 AM, Blogger shaileshkm said...

> वा..काय सुखी आयुष्य असेल माझं...

Was it?:)

 
At August 07, 2009 7:01 AM, Blogger Vaidehi Bhave said...

वाह!! मस्तच अनुभव हॉस्टेलचा!!

 
At December 14, 2010 3:50 AM, Blogger सम्या said...

Zakasss. Sanju chalu thev likhaan. Practice nee polish hot rahil.

 

Post a Comment

<< Home